
दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावरून राजू पटेल यांची चिंता; पारदर्शकतेची मागणी यवतमाळ / नागपूर, दि. १७ ऑक्टोबर २०२६ नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावरून निर्माण झालेला वाद आणि दीक्षाभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ताब्यात जाण्याची व्यक्त केली जाणारी भीती, ही बाब अत्यंत गंभीर असल्याची चिंता जनहित लोकशाही पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. राजू पटेल (यवतमाळ) यांनी व्यक्त केली आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच दीक्षाभूमीतील विविध खोल्यांना कुलूप लावणे आणि कर्मचाऱ्यांना धमकावणे यासंबंधी आरोप करण्यात आले आहेत. राजू पटेल म्हणाले, “दीक्षाभूमी हा केवळ स्मारक नाही, तर तो आमच्या अस्मितेचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि लाखो भीम अनुयायांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. तिथे हुकूमशाही चालणार नाही. जर व्यवस्थापनात पारदर्शकता आली नाही, तर हा वाद आणखी चिघळेल.” ते पुढे म्हणाले, “डॉ. राजेंद्र गवई आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेली भीती संपूर्ण आंबेडकरी समाजासाठी चिंतेचा विषय आहे. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चर्चेचा जो पुढाकार घेतला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. भदंत सुरई ससाई यांनी स्वतः पत्रकारांसमोर येऊन आपली भूमिका मांडावी, कार्यकर्त्यांना पुढे करू नये, अशी आमची मागणी आहे.” “दीक्षाभूमी कोणत्याही एका व्यक्तीची जहागीर नाही. ती समाजाची आहे. समाजाने आता पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा इतिहास आपल्याला माफ करणार नाही,” असेही राजू पटेल यांनी स्पष्ट केले. जनहित लोकशाही पार्टी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास नागपूर येथे सर्वपक्षीय बैठक घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही श्री. राजू पटेल यांनी दिला आहे. जय भीम! जय संविधान! श्री. राजू पटेल मलनस प्रदेश उपाध्यक्ष, जनहित लोकशाही पार्टी यवतमाळ, महाराष्ट्र संपर्क क्रमांक: 9075801000
संबंधित बातम्या
सरपंचांच्या आंदोलनाला जनहित लोकशाही पक्षाचा जाहीर पाठिंबा
जनहित लोकशाही पक्षाचे पक्षप्रमुख मा. अशोकराव आल्हाट यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या सरपंचांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. सरकारने सरपंचांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अंतरिम स्वरूपात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अशोकराव आल्हाट यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
दुष्काळाची पाहणी की फोटोसेशन? शेतकऱ्यांचे हाल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे का? ॲड. शंकर चव्हाण यांचा सवाल
जनहित लोकशाही पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. शंकर चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांच्या धाराशिव येथील दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार खरोखरच शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष देत आहे, की केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी हे दौरे केले जात आहेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. यासोबतच, अशा दौऱ्यांच्या वेळी तैनात केल्या जाणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.


